हागणदारीमुक्त गाव मानेपुरी . पंचायत समिती घनसावंगी जिल्हा जालना
पंचायत समिती घनसावंगी जिल्हा परिषद जालना , महाराष्ट्र
घनसावंगी जिल्ह्यात स्थित, आमचे कार्यालय प्रभावी प्रशासन आणि सामुदायिक सहभागाद्वारे विकासाला चालना देणे आणि मानेपुरीमधील रहिवाशांना पाठिंबा देणे हे आहे.
जातीचा घटक
मानेपुरी गावात अनुसूचित जाती (SC) ही १५.८७% आहे तर अनुसूचित जमाती (ST) ही ०.५३% आहे.
कार्यप्रदर्शन
मानेपुरी गावात एकूण लोकसंख्येपैकी ८३९ लोक कामात गुंतलेले होते. ९८.५७% कामगार त्यांचे काम मुख्य काम (रोजगार किंवा ६ महिन्यांपेक्षा जास्त कमाई) म्हणून वर्णन करतात तर १.४३% कामगार ६ महिन्यांपेक्षा कमी काळ उपजीविका पुरवणाऱ्या सीमांत कामात गुंतलेले होते. मुख्य कामात गुंतलेल्या ८३९ कामगारांपैकी ५३६ शेतकरी (मालक किंवा सह-मालक) होते तर २५८ शेतमजूर होते.
ग्रामपंचायत मानेपुरी ता घनसावंगी जि.जालना येथील जालना घनसावंगी रस्त्या च्या पश्चिमेस वसलेले आहे. गावाची सुमारे लोकसंख्या 1785 लोक वस्तीच हे गाव आडुळ या नदीच्या काठावर निवांत विसावलेले आहे तसेच या नदीवर साठवण तलाव 200 हे 25 आर क्षेत्रावर व्यापलेले आहे तसेच साठवण तलावामुळे शेजारील गावांचाही सिंचना साठी फायदा होत आहे एकुण क्षेत्रफळ 943 हे 13 आर गावाचे स्वरुप लहान पण त्यांची ओळख महान मानेपुरी गावास पुरातन वारसा लाभलेला असुन या ठिकाणी श्री संत माणकोजी बोधले बाबांची जिवंत संजिवणी समाधी आहे भव्य असे मंदिर असुन ते चारशे वर्षा पुर्वीचे चिर दगडी बांधकाम आहे गावा मध्ये दरवर्षी गुरूपौर्णिमेला यात्रा भरते तसेच संत भगवान बाबा यांच्या पद स्पर्शाने पावन झालेले असे मानेपुरी गावामध्ये बाबांचे भव्यदिव्य असे मंदिर आहे.तसेच ग्राम दैवत मारोती महाराज मंदिर, भद्रा मारोती, विठ्ठल रूख्माई मंदिर, गणपती मंदिर, महादेव मंदिर, लक्ष्मी माता मंदिर, तुळजा भवानी मंदिर, मोहटा देवी, खंडोबा मंदिर, कानिफनाथ मंदिर, संत बाळु मामा मंदिर एकुण गावामध्ये बारा मंदिरे आहेत गावा मध्ये दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. तसेच गावामध्ये शैक्षणीक प्रगती देखील उंच भरारी घेत आहे गावामधील युवा तरूण विविध शासकीय भरती मध्ये शिक्षक, पोलिस, तलाठी, लिपिक, इत्यादी पदावर कार्यरत आहे.
उत्पनाचे स्त्रोत
साठवण तलावा मुळे गावातील बागायती शेताचं स्वप्न मोसंबी, ऊस, भाजीपाला, कांदा, वेलवर्गीय पिक
माननीय जिल्हाधिकारी (भा.प्र.से.).जालना
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना
अति. मुख्य कार्यकारी अधिकारी
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं. विभाग जालना )
गट विकास अधिकारी ( पंचायत समिती घनसावंगी )
सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत समिती घनसावंगी
ग्रामपंचायत अधिकारी
सरपंच
उपसरपंच
ग्रामपंचायत अधिकारी
भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.
जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...










